नांदूरशिंगोटे सोसायटी निवडणुकीत ४० अर्ज

By Admin | Updated: September 13, 2016 00:58 IST2016-09-13T00:57:29+5:302016-09-13T00:58:51+5:30

नांदूरशिंगोटे सोसायटी निवडणुकीत ४० अर्ज

40 application in Nandurshoring Society election | नांदूरशिंगोटे सोसायटी निवडणुकीत ४० अर्ज

नांदूरशिंगोटे सोसायटी निवडणुकीत ४० अर्ज

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी ४० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
येथील विकास संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. ९३८ मतदारसंख्या असलेल्या विकास संस्थेतून १३ संचालक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी ९ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे.
सर्वसाधारण कर्जदार गटाच्या आठ जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी सात अर्ज आले. भटक्या विमुक्त जाती गटाच्या एका जागेसाठी पाच, अनुसूचित जाती जमाती गटाच्या एका जागेसाठी तीन, तर इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज असे १३ जागांसाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी संजय गायकवाड व सहायक सचिव गोपाळे यांनी दिली.
बुधवार, दि. १४ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. माघारीची अंतिम मुदत २९ सप्टेंबर रोजी आहे. संस्थेवर व्ही. आनंदराव शेळके, माजी सरपंच पी. डी. सानप, भाऊपाटील शेळके व शंकरराव शेळके गटाची सत्ता आहे. (वार्ताहर)

Web Title: 40 application in Nandurshoring Society election