शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात; आगीत दोघे गंभीरपणे भाजले, 7 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 01:27 IST

नाशिक-शिर्डी महामार्गावर शनिवारी (दि.14) सायंकाळी सिन्नरजवळ 4 वाहनांचा विचित्र अपघात घडला.

नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर शनिवारी (दि.14) सायंकाळी सिन्नरजवळ 4 वाहनांचा विचित्र अपघात घडला. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली; मात्र अपघातानंतर पेटलेल्या रिक्षामधील (एम.एच15 एफयू 3950) एक पुरुष व वृद्धा गंभीरपणे भाजले. स्थानिक युवकांनी त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रिक्षामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. घटनास्थळी आलेल्या सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या पेटलेल्या रिक्षामधील प्रवाशांना बाहेर काढून त्वरीत रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. या अपघातात एकूण 7 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आडवाफाटा येथे दोन दुचाकी, आयशर ट्रक व रिक्षा मध्ये विचित्र अपघात घडला.माळेगाव एमआयडीसी कडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाच्या पुढे अचानक दुचाकीस्वार आल्यामुळे रिक्षाचालकाने अपघात टाळण्यासाठी ब्रेक दाबला असता पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर ने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाने पाठीमागून अचानक पेट घेतला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार, रिक्षाचालक, रिक्षामधील 4प्रवाशी गंभीर रित्या जखमी झालेत. रिक्षा ने पेट घेतल्याने रिक्षा मधील एक इसम अन वयोवृद्ध महिला मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत.जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत, पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत.