शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू पदविका परीक्षेत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:25 IST

शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच अरेबिक भाषेत फरहत सय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

नाशिक : शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच अरेबिक भाषेत फरहत सय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे. मागील वर्षी उर्दूमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ उर्दू लॅँग्वेजकडून एप्रिल-२०१९मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उर्दूसाठी ३७, तर अरेबिक भाषेसाठी १६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याने दोन्ही भाषांच्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती प्रा.जाहिद शेख यांनी दिली.उर्दू भाषेच्या परीक्षेत फारूख बागवान यांनी द्वितीय व शरद पगारे यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणधिकारी अनिल शहारे, माजी विस्तार अधिकारी भीमराव गरड, रश्मी काळोखे, अ‍ॅड. आसीम शेख, गौरव देशमुख, डॉ. सतीश करंदीकर आदींनी विशेष प्रावीण्यात यश मिळविले. अरेबिक पदविका अभ्यासक्रमात राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी हसन सय्यद यांनी प्रथम, तर आरीफ अब्दुल कादर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. उर्दूचे धडे जमीर पठाण व अरेबिक भाषेचे धडे मौलाना युनूस सकाफी यांनी परीक्षार्थींना दिले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण