शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

व्यावसायिकांना घातला ४ कोटींना गंडा, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 06:48 IST

कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जादा नफ्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाइल डिलर्सकडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस  आला आहे. या प्रकरणी औरंगाबादचे व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित डिलर्सविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

मेन रोडवरील वावरे लेनमधील  ईगल इलेक्ट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.चे संचालकांविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे. औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई-मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखविले व लाखो रुपये उकळले; संशयिताने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाइलचा पुरवठा केला नाही. संबंधित मोबाइल कंपनीच्या मुख्य डिलर्सकडे चौकशी केली असता, ही बाब उघड झाली. मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यावसायिकांकडून घेतली. ऑगस्ट महिन्यात मोबाइलचा माल पुरविला नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. व्यावसायिकांनी मोबाइल कंपनीकडे  चौकशी केली असता, त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगितले.

बनावट ई-मेलद्वारे फसवणूकसंशयित खेमानी यांनी मालीवाल यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून  ‘सुपरमनी’ कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना ३५ लाखांची मर्यादा ठरवून दिली. १ जुलै, २०२२ रोजी खेमानी  यांनी मालीवाल यांच्या संमती न घेता, १२ लाख ६४ हजार ७५४, १० लाख ५१ हजार १८१, आणि १० लाख ८४ हजार ०६५ रुपये कंपनीच्या बँक खात्यामधून अन्य खात्यात वर्ग करून घेतले. 

नवीन ‘स्कीम’ सांगून ७० लाखसंशयित खेमानी यांना मालीवाल यांनी रक्कम का खात्यातून वर्ग केली, असे विचारले असता, त्यांनी नवीन ‘स्कीम’ येणार आहे, त्यासाठी ८० ते ९० लाखांची गुंतवणूक करा, यापेक्षाही जास्त नफा होईल, असे सांगितले. मालीवाल यांनीही आमिषापोटी स्वत:च्या खात्यात ७० लाख ८  हजार रुपये भरणा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक