मालेगाव शहरात ३९ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:13 IST2020-08-12T20:31:26+5:302020-08-13T00:13:18+5:30
मालेगाव : शहरातील १३९ जणांचे तपासणी अहवाल मिळाले असून, त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात संगमेश्वर, कलेक्टरपट्टा आणि मालेगाव कॅम्प परिसरातील बाधितांची संख्या अधिक आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असून, आरोग्य विभागाने पश्चिम भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

आज मिळालेल्या अहवालांमध्ये कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी कॉलनीत ५० वर्षीय इसम, साईबाबानगरमध्ये २५ व ४० वर्षीय इसम, वीर सावरकरनगरमध्ये ४४ वर्षीय इसम, कलेक्टरपट्टा भागातील २८ वर्षीय महिला, निसर्ग कॉलनीतील ५१ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, ७ वर्षांचा मुलगा, १३ वर्षाची मुलगी कोरोना बाधित मिळून आले. संगमेश्वर भागातील जगताप गल्लीतील ७० वर्षीय वृद्ध, सावतानगरातील ५३ वर्षीय इसम, महादेव मंदिर भागातील २७ वर्षीय महिला, ३१ व ६८ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, पाटीलवाडा भागात ३५ वर्षीय इसम, ज्योतीनगरातील १४ वर्षांची मुलगी बाधित मिळून आली. सोयगावी शिरकावसोयगावच्या कलंत्री बंगला भागातील ५७ वर्षीय पुरुष, आनंदनगरमधील ३१ वर्षीय पुरुष, फुलेनगरातील ८० वर्षीय इसम, पाटकिनारा एलआयसी मागील ६१ वर्षीय पुरुष यासह पातोंडा येथील ६८ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे .