नाशिकमध्ये आठ महिन्यांत ३७ पादचाऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 04:50 IST2018-09-11T04:50:54+5:302018-09-11T04:50:57+5:30
जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्यांत रस्ते अपघातात १२० जणांचा मृत्यू झाला, त्यात ३७ पादचा-यांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये आठ महिन्यांत ३७ पादचाऱ्यांचा मृत्यू
- विजय मोरे
नाशिक : जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्यांत रस्ते अपघातात १२० जणांचा मृत्यू झाला, त्यात ३७ पादचा-यांचा समावेश आहे. शहरातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रोड, कॉलनी रस्ते हे पादचाºयांसाठी धोकदायक ठरत आहेत.
रस्ता ओलांडताना, रस्त्याच्या कडेने चालणाºयांना वाहनांची धडक बसून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.शहरातील राष्ट्रीय महामार्गावर १६, सर्व्हिस रोडवर पाच तर कॉलनीरोड, राज्य महामार्ग आणि इतर छोट्या रस्त्यांवर १६ पादचाºयांना अपघातात जीव गमवावा लागला. त्यात वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ वाहन चालकांना हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली जात आहे.