गटांसाठी ३५३, गणांसाठी ६७५ उमेदवार
By Admin | Updated: February 14, 2017 02:03 IST2017-02-14T02:03:06+5:302017-02-14T02:03:18+5:30
गटांतून २५१, तर गणांतून ४३९ अर्ज माघारी

गटांसाठी ३५३, गणांसाठी ६७५ उमेदवार
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७३ गट व १४६ गणांसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारी (दि.१३) या अखेरच्या दिवशी ७३ गटांसाठी ३५३, तर १४६ गणांसाठी ६७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी दिली. काही गट व गणात थेट दुरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. गटांसाठी एकूण २५१, तर गणांसाठी ४३९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज छाननीत मागील सोमवारी ७३ गटांसाठी ७८९, तर १४६ गणांसाठी १२७३ अर्ज वैध ठरले होते. सोमवारी (दि.१३) उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी गटांसाठी एकूण ३५३, तर गणांसाठी एकूण ६७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार
असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)
रिंगणातील उमेदवार
शिल्लक राहिलेल्या गटांसाठीच्या एकूण उमेदवारांची संख्या, कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या - बागलाण- ३१ (१६), मालेगाव- ३१ (२१), देवळा- १५ (१४), कळवण- १६ (७), सुरगाणा- १४ (६), पेठ - ११ (३), दिंडोरी - ३३ (२७), चांदवड - २० (१६), नांदगाव - २४ (१२), येवला - १८ (२३), निफाड - ५९ (३७), नाशिक - १९ (१५), त्र्यंबकेश्वर - १५ (५), इगतपुरी - २९ (१९), सिन्नर - १८ (३) एकूण ३५३ पंचायत समिती गणातील उमेदवारांची संख्या कंसात माघारांची संख्या - बागलाण- ५५ (१५), मालेगाव - ६३ (३५), देवळा - २१ (२२), कळवण - ४२ (१७), सुरगाणा - १९ (१५), पेठ- २४ (८), दिंडोरी- ६४ (३५), चांदवड- ३९ (२८), नांदगाव- ३४ (४०), येवला - ४६ (२६), निफाड - ९२ (८०), नाशिक- ४० (२५), त्र्यंबकेश्वर - ३६ (१०), इगतपुरी - ५९ (३२), सिन्नर - ४१ (५१).