नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी

By Admin | Updated: June 10, 2014 00:38 IST2014-06-10T00:23:04+5:302014-06-10T00:38:23+5:30

नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी

350 crore for infrastructure in Nashik | नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी

नाशिकला पायाभूत सुविधांसाठी ३५० कोटी

 

नाशिक : एमआयडीसीअंतर्गत औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ३५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सोमवारी जानोरी आणि जऊळके या औद्योगिक वसाहतींचा पाहणी दौरा करून समितीच्या सदस्यांनी मूलभूत सुविधांची माहिती घेतली.
ज्या औद्योगिक वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्यांना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘निमा’सह अन्य औद्योगिक संघटनांनी शासनाकडे केली होती. मागील महिन्यात एमआयडीसीचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सोमवारी जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक पी. पी. दाबेराव, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जऊळके व जानोरी वसाहतींना भेट देऊन रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप यांसह मूलभूत सुविधांची माहिती घेतली.
(प्रतिनिधी)

Web Title: 350 crore for infrastructure in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.