पंचवटीत दंगल घडविल्याप्रकरणी ३५ संशयितांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 16, 2017 17:31 IST2017-05-16T17:31:34+5:302017-05-16T17:31:34+5:30
पाथरवट लेन येथिल घटना : लाठया काठया अन तलवारी बरसल्या

पंचवटीत दंगल घडविल्याप्रकरणी ३५ संशयितांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पाथरवट लेन येथिल प्रतापसिंह चौकात जुन्या वादातून कुरापत काढून तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते तसेच धारदार शस्त्रास्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवून उभ्या दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांच्या काचा फोडूत दंगल घडवून आणल्याप्रकरणी पंचवटी पोलीसात अंदाजे ३५ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी पाच ते सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.