शहरात ३३५ गणेश मंडळांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:40 IST2017-08-25T00:40:35+5:302017-08-25T00:40:53+5:30
यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची कोटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने महापालिकेमार्फत मंडळांकडून परवानगीसाठी आलेल्या अर्जांचीही गांभीर्यपूर्वक छाननी केली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने प्राप्त ३६७ अर्जांपैकी ३३५ मंडळांना परवानगी दिली असल्याची माहिती विविध कर विभागातून देण्यात आली.

शहरात ३३५ गणेश मंडळांना परवानगी
नाशिक : यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची कोटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने महापालिकेमार्फत मंडळांकडून परवानगीसाठी आलेल्या अर्जांचीही गांभीर्यपूर्वक छाननी केली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने प्राप्त ३६७ अर्जांपैकी ३३५ मंडळांना परवानगी दिली असल्याची माहिती विविध कर विभागातून देण्यात आली.
सार्वजनिक उत्सव काळात रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा मंडप उभारणीस यंदा मनाई करण्यात आलेली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नियमावलीप्रमाणे जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यांचे संयुक्त पथक सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेल्या मंडपांची तपासणी करत आहेत. नियमावलीनुसार पूर्तता करणाºया मंडळांनाच परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत महापालिकेकडे परवानगीसाठी ३६७ गणेश मंडळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३३५ मंडळांना महापालिकेने परवानगी दिलेली आहे, तर ३२ मंडळांची परवानगीची प्रक्रिया कार्यवाहीत आहे. संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीनुसार, ४१९ मंडळांनी प्रत्यक्ष मंडपाची उभारणी केलेली आहे. त्यातील सुमारे ५० मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्जच केलेले नाहीत. परवानगी दिलेल्या मंडळांच्या संख्येनुसार यंदा नाशिक पश्चिम आणि पंचवटीत सर्वाधिक ७४ मंडळे आहेत. तर नाशिक पूर्व विभागात सर्वात कमी २९ मंडळांची संख्या आहे. सिडकोत सुमारे २५ मंडळांनी अनधिकृतपणे मंडप उभारणी केल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. त्यानुसार, महापालिकेकडून कार्यवाही केली जात आहे. रस्त्यात उभारण्यात येणाºया मंडपांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात आहे. त्यास मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे. काही मंडळांची नाराजी असली तरी त्यातूनही तोडगा काढण्यात आला. ज्याठिकाणी गर्दी होऊ शकेल अशा ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे.