येवल्यातील 33 बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:31 IST2020-10-17T20:41:07+5:302020-10-18T00:31:32+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील 33 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. शुक्र वारी, (दि. 16) शासकीय पोर्टलवरील नोंदीनुसार शहरातील 21 व तालुक्यातील 9 असे एकूण 30 संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहत.

येवल्यातील 33 बाधित कोरोनामुक्त
येवला : शहरासह तालुक्यातील 33 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. शुक्र वारी, (दि. 16) शासकीय पोर्टलवरील नोंदीनुसार शहरातील 21 व तालुक्यातील 9 असे एकूण 30 संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहत. दरम्यान, हे सर्व बाधित खासगी रूग्णालयातून तर नगरसूल येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटरमधून 3 असे एकूण 33 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 927 झाली असून आजपर्यंत 831 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला अॅक्टीव्ह रूग्ण संख्या 46 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.