प्रभाग रचनेवर ३२ हरकती दाखल
By Admin | Updated: October 25, 2016 23:49 IST2016-10-25T23:48:55+5:302016-10-25T23:49:32+5:30
मनपा निवडणूक : दिवाळीनंतर होणार सुनावणी

प्रभाग रचनेवर ३२ हरकती दाखल
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दिलेल्या मुदतीत एकूण ३२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींवर दि. ९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घ्यायची असल्याने दिवाळीनंतरच त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. सदर सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कौशल्य विकास व उद्योग विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची नियुक्ती केलेली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेवर दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. दि. २४ आॅक्टोबरपर्यंत महापालिकेकडे अवघ्या दहा हरकती प्राप्त झाल्या होत्या. मात्र, मंगळवारी अखेरच्या दिवशी २२ हरकती प्राप्त होऊन हरकतींची संख्या ३२ इतकी झाली आहे. हरकती दाखल करताना अनेकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे, शिवाय नैसर्गिक हद्दीचेही उल्लंघन करत रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.