जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी नाशिकमध्ये १९८९ मध्ये संपन्न झालेल्या संत संमेलनामध्ये अयोध्येत पाठविण्यात येणाऱ्या विटेचे विधिवत पूजन करून श्रीराम मंदिर निर्माणासाठी संकल्प केलेला होता. तो संकल्प पूर्ण होत असताना, स्वामीजींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अवघ्या काही दिवसांत निधी संकलन मोहीम राबवून ३२ लाख १५ हजार ६७८ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. योगायोगाने जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे या वर्षी ३२वे पुण्यस्मरण आहे. श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख शंकरराव गायकर व विवेक कुलकर्णी यांच्याकडे ओझर येथील जनशांती धाम येथे स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते नुकताच हा निधी सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी स्वामी रामानंदजी महाराज, शिवाभाऊ अंगुलगावकर, विष्णू महाराज, ज्ञानेश्वर भुसे, राजेंद्र पवार यांसह आश्रम विश्वस्त, कमिटी सदस्य, तसेच जय बाबाजी भक्त परिवारातील प्रमुख भाविक उपस्थित होते.
जयबाबाजी परिवाराकडून ३२ लाखांचा निधी सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:36 IST
ओझरटाउनशिप : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी अवघ्या काही दिवसांत संकलन करून ३२ लाख १५ हजार ६७८ रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला.
जयबाबाजी परिवाराकडून ३२ लाखांचा निधी सुपुर्द
ठळक मुद्दे श्रीराम मंदिर निर्माण : अल्प कालावधीत निधी संकलन