शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरीचा पर्दाफाश ३२ सिलिंडर जप्त : निमसे मळ्यातील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:06 AM

नांदूर नाका भागातील निमसे मळा शिवारात घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा सुरू असलेला अवैध व्यवसायाचा अड्डा आडगाव व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला आहे.

ठळक मुद्देसिलिंडरसह मिनी टेम्पो जप्त यंत्राच्या साहाय्याने गॅस चोरीपावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंचवटी : नांदूर नाका भागातील निमसे मळा शिवारात घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा सुरू असलेला अवैध व्यवसायाचा अड्डा आडगाव व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला आहे. सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ३२ सिलिंडरसह मिनी टेम्पो जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी (दि. ३०) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा व आडगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरीत्या गॅस चोरीचा अड्डा उद्ध्वस्त केला. आगर टाकळीमधील समतानगर येथील रहिवासी असलेला मुकेश रामभाऊ पाथरे (३३) हा सदर अवैध व्यवसाय करत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, नांदूर नाक्यावरील निमसे मळा परिसरात संशयित पाथरे हा ग्राहकांना वाटप केल्या जाणाºया घरगुती गॅस सिलिंडरमधून यंत्राच्या साहाय्याने गॅस चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निमसे मळा येथील अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी छोटा हत्ती चारचाकी वाहन (क्र . एमएच १५ डीजे ३८२१) सिलिंडरने भरलेला आढळून आला तसेच घटनास्थळी सिलिंडरमधून गॅस दुसºया सिलिंडरमध्ये भरण्यासाठी लागणारे यंत्रही पोलिसांनी येथून जप्त केले. पोलिसांनी घटनास्थळाहून तब्बल ३२ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर तसेच सिलिंडर वाहतूक करणारे वाहन, यंत्रसामग्री असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित पाथरे याला अटक केली आहे. संशयित हा परिसरातील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीला आहे; मात्र कोणत्या वितरकाकडे तो क ाम करतो, हे समजू शकले नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संपत लोहकरे पुढील तपास करीत आहेत.