जिल्'ात १५ जागांसाठी ३१३ उमेदवार

By Admin | Updated: September 28, 2014 00:45 IST2014-09-28T00:43:47+5:302014-09-28T00:45:17+5:30

उमेदवारांची पळवापळवी

313 candidates for 15 seats in the district | जिल्'ात १५ जागांसाठी ३१३ उमेदवार

जिल्'ात १५ जागांसाठी ३१३ उमेदवार

नाशिक : निवडणूक अर्ज दाखल करण्यास अवघे काही मिनिटे बाकी असताना, उमेदवारांची झालेली पळवापळवी, ऐनवेळी तिकीट बदलल्याने व्यक्त झालेली नाराजी व बंडखोरीचा घेतलेला पवित्रा, ए-बी फॉर्मवरून इच्छुकांमध्येच झालेली लठ्ठालठ्ठी अशा परिस्थितीत जिल्'ातील पंधरा मतदारसंघांसाठी ३१३ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यांनी ५३८ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी या अर्जांची छाननी करण्यात येणार असून, तेव्हापासूनच माघारीला सुरुवात होईल. निवडणुकीचे खरे चित्र १ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अखेरपर्यंत उमेदवारांच्या नावांचा घोळ सुरू असल्याने त्याचे पडसाद उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमटले. ऐनवेळी उमेदवार मिळत नाही म्हणून भाजपाने सेनेचे इच्छुक चंद्रकांत खाडे यांना इगतपुरीतून उमेदवारी दिली, तर सेनाइच्छुक प्रताप मेहरोलिया यांना मनसेने गळाला लावून देवळालीतून उभे केले. भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी नाशिक पश्चिममधून अपक्ष झेंडा हातात घेतला. त्याचबरोबर याच मतदारसंघात नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांना सेनेने डावलल्याने त्यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधत बंडखोरी जाहीर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इच्छुक दिलीप बोरसे यांना भाजपाने पळविले, तर येवल्यातून मनसेने जाहीर केलेले उमेदवार सेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी ऐनवेळी अर्ज भरण्यास नकार देऊन भूमिगत झाले.

Web Title: 313 candidates for 15 seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.