अडीच लाखांचे ३१ मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:38+5:302021-07-04T04:11:38+5:30
नाशिक रोड परिसरात घरात खिडकीजवळ ठेवलेले व दुकानात नजर चुकवून मोबाइल चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. उपनगरचे वरिष्ठ ...

अडीच लाखांचे ३१ मोबाइल जप्त
नाशिक रोड परिसरात घरात खिडकीजवळ ठेवलेले व दुकानात नजर चुकवून मोबाइल चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस विकास लोंढे, पोलीस कर्मचारी सोमनाथ गुंड यांनी बारकाईने सर्व चोरीच्या घटनांची माहिती मिळविली. चोरलेले मोबाइल कोण विक्री करतो, याची माहिती घेत कसोशीने शोध घेतला. दत्त मंदिर सिग्नल येथे चोरलेला मोबाइल विक्रीस करण्यास आलेला संशयित विलास छोटू थोरात (४०, रा.वडारवाडी, देवळालीगाव) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच, घरासमोरील राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने विलास त्या मुलीला घरात पाठवून व दुकानातून नजर चुकवून चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित विलास थोरात याच्या घरातून अडीच लाख रुपये किमतीचे महागडे ३१ मोबाइल जप्त केले आहेत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.