सभापतिपदाचा ३०ला फैसला

By Admin | Updated: June 22, 2014 00:32 IST2014-06-22T00:11:50+5:302014-06-22T00:32:57+5:30

सभापतिपदाचा ३०ला फैसला

30th Decision of the Speaker | सभापतिपदाचा ३०ला फैसला

सभापतिपदाचा ३०ला फैसला

 

नाशिक : महापालिकेच्या बहुप्रतिक्षीत स्थायी समिती सभापतिपदासाठी अखेरीस ३० तारखेला फैसला होणार आहे. महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या ठरावानंतर आज ही तारीख देण्यात आली असून, त्यामुळे सभापतिपदासाठी स्पर्धा वाढणार आहे.
आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तर नंतर स्थायी समितीतील मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या जागी नूतन सदस्य नियुक्तीसाठी झालेला विलंब यामुळे सभापतिपदाची निवड लांबणीवर पडली होती. गेल्या आठवड्यात १० जून रोजी नूतन सदस्य नियुक्त झाल्यानंतर विशेष महासभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर शनिवारी ३० जून ही तारीख सभापतिपदासाठी देण्यात आली आहे. अपर आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान, सभापतिपदाची तारीख निश्चित झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्यावेळेस प्रमाणे यंदाही मनसे, भाजपा आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढविणार आहे. गेल्यावर्षी मनसेला सभापतिपदासाठी संधी देताना तसे ठरले होते. तथापि, सदरचे तिन्ही पक्ष सभापतिपदावर दावा सांगत असल्याने रस्सीखेच वाढली आहे. मनसेकडून शेखर ढिकले यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
सेनेकडून सचिन मराठे यांची दावेदारी प्रबळ आहे, तर भाजपाकडून रंजना भानसी आणि प्रा. कुणाल वाघ इच्छुक आहेत. तिन्ही पक्षांत बिनसले तर वेगळी गणिते मांडली जात असून, कॉँग्रेसकडून शिवाजी गांगुर्डे आणि राहुल दिवे यांनीदेखील तयारी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 30th Decision of the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.