३० टन कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला.
By Admin | Updated: November 17, 2014 00:48 IST2014-11-17T00:47:09+5:302014-11-17T00:48:29+5:30
३० टन कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला.

३० टन कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले गेले. या अभियानाअंतर्गत नाशिक शहरामध्ये १६५ किमी रस्त्यांची स्वच्छता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. त्यामध्ये एकूण ३० टन कचरा संकलित करून महानगरपालिकेच्या घंटागाडीतून कचरा डेपोपर्यंत पोहोचविण्यात आला. या अभियानाला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे आदि उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल व आजारपण टळतील, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता ठेवण्यास मदत केली तर भारत हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात जागरूक देश समजला जाईल, असे मत यावेळी उपस्थितांकडून मांडण्यात आले. अभियानात या प्रतिष्ठानतर्फे हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य स्वयंसेवकांना पुरविण्यात आले होते. शहरातील सर्व ठिकाणी हे अभियान राबविले गेले असून, अनेक स्वयंसेवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोदविला. (प्रतिनिधी)