दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

By Admin | Updated: September 29, 2015 00:18 IST2015-09-29T00:18:29+5:302015-09-29T00:18:56+5:30

दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

30 students of Dindori hostel, vomiting, laxatives | दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

दिंडोरी : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागांतर्गत दिंडोरी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील ३० शालेय विद्यार्थिनींना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. यापैकी १६
मुलींचा दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य १४ मुलींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
या वसतिगृहातील दोन मुलींना
रविवारी (दि. २७) उलट्या-जुलाबांचा त्रास झाला असता
त्यांना प्रथम खासगी दवाखान्यात उपचार घेण्याचा प्रयत्न केला. इतर मुलींना त्रास सुरू झाल्याने
सोमवारी (दि. २८) रोजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उलट्या व जुलाब कशामुळे झाले याचे कारण समजू
शकले नाही. आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे.
या वसतिगृहात नवे व जुने अशा दोन्ही विभागांत एकूण २१४ मुली राहतात. या मुलींनी रविवारी सकाळचा नास्ता केला. त्यानंंतर दोन मुलींना उलट्या व जुलाब झाले. या मुलींना खासगी रुग्णालयात उपचार केले, परंतु तद्नंतर अन्य मुलींनादेखील उलट्या व जुलाब त्रास होऊ लागल्याने वसतिगृहातच औषध उपचार केले. मात्र
सोमवारी संख्या वाढतच गेली असता ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी व तालुका वैद्यकीय अधिकारी ढाके यांनी मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. १६ मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. १४ मुलींना प्राथमिक उपचार करण्यात आले.
वसतिगृहातील शिजवलेल्या अन्नाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.
पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते, कॉ. वाघेरे, शेलार, भरसट, लो. ह. खेडकर पगारे आदि याबाबत तपास करत आहे. सुनीता पाडवी, वैशाली गायकवाड, अर्चना गायकवाड, अश्विनी गांगुर्डे, भारती चारोस्कर, शोभा उगले, हर्षदा झिरवाळ, रोहिणी गांगुर्डे, सुरेखा गायकवाड, देवकी धूम, सरला धोंगडे, सुनीता राऊत,
संगीता पालवे, छाया गावंडे,
नमिता गावंडे, रंजना धूम या मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: 30 students of Dindori hostel, vomiting, laxatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.