चौकट-
भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो)
भाजीपाला १ जून २२ जून
टमाटा १५ २०
वांगी (गावठी) ५० ७०
शिमला मिरची ४० ६०
भेंडी ४० ५०
गिलका ३५ ५०
दोडके ५५ ७०
कारले ४० ६०
काकडी १५ ३०
गवार (गावठी) ६० ९०
कांदा १५ २५
बटाटे १५ २०
मिरची ३० ४०
चौकट-
पुन्हा वरणावर जोर
कोट -
भाजीपाला महागल्याने रोज काय भाजी करावी, असा प्रश्न पडतो. भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने रोज भाजी करण्यापेक्षा एखाद्यावेळी वरणभात करावा लागतो. त्याबरोबर एक भाजी असली तरी पुरेशी होते. - रंजना आहिरे, गृहिणी
कोट-
आमच्या घरात प्रत्येकाच्या भाज्यांची आवडनिवड वेगवेगळी आहे. त्यामुळे सर्वांना एक भाजी करून जमत नाही. त्यापेक्षा वरणभाताचा स्वयंपाक करणे सोयीचे ठरते. यामुळे जास्त भाज्याही घ्याव्या लागत नाहीत. आणि सर्वांची आवडही जपली जाते. - मनीषा वाघ, गृहिणी
चौकट-
म्हणून वाढले दर
कोट-
वातावरणातील बदलामुळे बाजार समितीत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. त्याचबरोबर उठाव वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. लॉकडाऊनमध्ये वाहतुकीची समस्या होती. आता निर्बंध शिथिल झाल्याने ग्राहकी वाढली आहे. - जगदीश अपसुंदे, भाजीपाला व्यापारी
कोट-
किरकोळ विक्रेत्यांना चढ्या भावानेच मालाची खरेदी करावी लागत असल्याने विक्रीही त्या पद्धतीनेच होते. आमची शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असल्याने आमच्याकडे दरामध्ये थोडाफार फरक पडत असला तरी वाहतुकीचे वाढलेले दर आणि मालाची टंचाई यामुळेही दरवाढ झाली आहे. - दिनकर गायधनी, भाजीपाला विक्रेता
चौकट-
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
कोट-
भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी ते किरकोळ बाजारात शेतकऱ्यांच्या हाती मात्र फारसे काही पडत नाही. शेतकऱ्यांकडून अगदी कमी भावात भाजीपाला खरेदी केला जातो. नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांनाही तो देण्याशिवाय पर्याय नसतो. - ज्ञानेश्वर पवार, शेतकरी
कोट-
पावसाळ्यात भाजीपाला टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. टमाट्यावर वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागते. त्याचबरोबर मजुरी, वाहतूक यांचा खर्च गृहीत धरला तर २० किलोच्या जाळीला मिळणारा भाव न परवडणाराच आहे. - दीपक गायधनी, शेतकरी