दुकान फोडून ३ लाख ७२ हजारांचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:48+5:302021-09-10T04:20:48+5:30

याबाबतचे वृत्त असे की जऊळके दिंडोरी येथील सरस्वतीनगर शिवारात कुणाल पटेल, रा. आडगाव नाका, पंचवटी यांचे मारुती सेल्स ...

3 lakh 72 thousand materials were stolen from the shop | दुकान फोडून ३ लाख ७२ हजारांचे साहित्य लंपास

दुकान फोडून ३ लाख ७२ हजारांचे साहित्य लंपास

याबाबतचे वृत्त असे की जऊळके दिंडोरी येथील सरस्वतीनगर शिवारात कुणाल पटेल, रा. आडगाव नाका, पंचवटी यांचे मारुती सेल्स काॅर्पोरेशन हे इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्याचे दुकान आहे. बुधवारी (दि.८) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बाहेरील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दुकानातील १ लाख ८५ हजार रुपये किमतीची कॉपर वायंडिंग वायर, एक लाख रुपये किमतीचे सबमर्सिबल मोटार सेट, २० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, प्रिंटर, टीव्ही व इतर असा ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत पटेल यांच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे अधिक तपास करत आहेत.

Web Title: 3 lakh 72 thousand materials were stolen from the shop