शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

घोटी येथे ३ झोपडया आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:38 IST

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.

ठळक मुद्देकाही क्षणात संपूर्ण संसार बेचिराख : हजारोंचे नुकसान

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.घोटी येथील पश्चित्ररायनगर भागात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कातकरी समाजाची ३ कुटुंबे वास्तव्याला आहेत. जगन बाबू हीलम, देवराम जगन हीलम, सावळीराम शंकर राऊत, रत्नाबाई सावळीराम राऊत, महादू सावळीराम राऊत, तनिशा सावळीराम राऊत असे ३ कुटुंब राहत होते.तीन झोपड्यांमधील १ कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असून उर्वरित २ कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान घरातील रॉकेलच्या दिव्यामुळे आग लागली. त्याचवेळी शेजारील जनार्दन नवले यांनी प्रसंगावधान राखत आग आरडाओरड केली व कुटुंबातील सर्वांना उठवले व त्वरित घराबाहेर काढल्याने ५ जणांचे प्राण वाचले. झोपडीत २० कोंबड्या, रोख रक्कम, मासेमारी करिता लागणारे साहित्य, महत्वाची कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे आदी सर्वच्या सर्व काहीवेळातच बेचिराख झाले.या अचानक लागलेल्या आगीत जवळपास ५० हजाराहून अधिक रकमेच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.मध्यरात्री लागलेली आग वाऱ्यामुळे फैलावली व घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.या आगीचे लोणमहामार्गावरील टोल नाक्यावरून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते.ही आग लागल्याचे समजताच समाधान गोईकने, निलेश भोर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या घरातून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र झोपडीतील सर्व वस्तू त्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.हातावरचे काम व मजुरी करून पोट भरत असलेल्या या कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला. लोकडाऊन मुळे सर्व धंदे ठप्प झालेले, त्यात उर्वरित संसार जळून खाक झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यानंतर सकाळी घोटी ग्रामपालिकेचे सरपंच रामदास भोर, विकास जाधव, प्रशांत रुपवते, सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी घटनास्थळी जाऊन आगीचा पहाणी केली.नुकसानग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी संसारपयोगी वस्तू व किराणा देणार असल्याचे सरपंच भोर यांनी सांगितले. घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी देखिल सदर कुटुंबाचे सांत्वन केले व चौकशीचे आदेश दिले. पुढील तपास शरद कोठुळे, शीतल गायकवाड हे करीत आहेत.नशीब बलवत्तर म्हणून...मध्यरात्री साखरझोपेत असतांना शेजारील जनार्दन नवले हे बाहेर झोपलेले असल्याने यांना जळण्याचा वास आल्याने व आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करीत संपूर्ण कुटुंब घराबाहेर काढल्याने जीवित हानी टळली. (२८ घोटी १, २)

 

 

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा