महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ३ कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST2021-09-08T04:19:25+5:302021-09-08T04:19:25+5:30
--इन्फो-- ...असा मोजला जातो वेग शहर, ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने अत्याधुनिक अशा इन्टरसेप्टर वाहनाद्वारे महामार्गांवरील वाहनांचा वेग मोजला ...

महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ३ कोटी !
--इन्फो--
...असा मोजला जातो वेग
शहर, ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने अत्याधुनिक अशा इन्टरसेप्टर वाहनाद्वारे महामार्गांवरील वाहनांचा वेग मोजला जातो. शहर वाहतूक शाखेकडे दोन इन्टरसेप्टर व्हॅन असून, यामध्ये आधुनिक स्पीड गन लावण्यात आलेली आहे. या वाहनातील स्मार्ट कॅमेरे हे १ किमी अंतरावरून सहज टिपतात. मागील दोन ते तीन वर्षांपासून या आधुनिक वाहनांचा वापर महामार्गांवरील सुसाट वाहनांचा वेग मोजण्यासाठी केला जात आहे.
--इन्फो--
दंडाची पावती मोबाइलवर
आरटीओकडील नोंदणी असलेल्या वाहनाच्या क्रमांकानुसार वाहनमालकाच्या मोबाइल क्रमांकावर दंडाच्या रकमेचा मेसेज धाडला जातो. त्यामुळे ऑनलाइन त्या व्यक्तीला आपल्या वाहनाला कधी, का, कोठे दंड झाला, या प्रश्नांची उत्तरे मिळतात. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपये इतका दंड होतो.
--आकडेवारी--
कोणत्या महिन्यात किती दंड
महिना- दंड (लाखांत)
जानेवारी- ३६,९६०००
फेब्रुवारी- ३३,२२,१००
मार्च- ५५,६४०००
एप्रिल- ४७,२१०००
मे- ४४,४६०००
जून- ३८,९८०००
जुलै- ७२,६२०००