शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मातृवंदन योजनेसाठी ३८३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:46 IST

केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना तीन टप्प्यांत आर्थिक लाभ दिला जातो.

ठळक मुद्देखामखेडा आरोग्य केंद्र : १९ लाख रुपयांचे अनुदान वाटप

खामखेडा : केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे.गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना तीन टप्प्यांत आर्थिक लाभ दिला जातो.खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपकेंद्रांतर्गत गत तीन वर्षांत ३८३ गर्भवती महिला लाभार्थींची नोंदणी झाली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने १९ लाख १५ हजार रु पयांचा लाभ मिळाल्याची माहिती खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदाकिनी दाणी आणि डॉ. जयश्री पगार यांनी दिली. देवळा तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पहिल्या वेळेस गर्भवती राहणाऱ्या महिलांना घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.ही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचावी यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदाकिनी दाणी आणि डॉ जयश्री पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आशा गटप्रवर्तक स्वाती जाधव या गटातील आशा कार्यकर्त्यांना सतत प्रोत्साहित करीत आहेत.या योजनेतून तीन टप्प्यांत लाभ देण्यात येतो. पहिल्या टप्प्यात मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात एक हजार रु पये जमा केले जातात. दुसºया टप्प्यात किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. तिसºया टप्प्यात प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकांचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. १ जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२० या तीन वर्षांत खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातून लाभार्थींची नोंदणी झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यGovernmentसरकार