जिल्ह्यात २९९५ बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST2021-03-29T04:10:15+5:302021-03-29T04:10:15+5:30
जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरूच ठेवला असून रविवारी पुन्हा तीन हजारा नजीक बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ...

जिल्ह्यात २९९५ बाधित !
जिल्ह्यात कोरोनाने कहर सुरूच ठेवला असून रविवारी पुन्हा तीन हजारा नजीक बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८९०, नाशिक ग्रामीण मध्ये ९१७, मालेगाव मनपा क्षेत्रात ७८ तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये ४० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराथी रुग्णांची संख्या तब्बल २४९७८ वर पोहोचली आहे. शहरासह जिल्ह्यातील रुग्णांना देखील ऑक्सीजन बेड किंवा व्हेंटिलेटर मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील खुप खाली आले असून रविवारी हे प्रमाण ८५ टक्केखाली ८४.११ वर आले आहे. दरम्यान जिल्ह्यात २१७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. रविवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ८ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील 6 नाशिक ग्रामीण मधील तर ४ जण मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहेत.