नाशिकरोडला २९१ उमेदवारांचे अर्ज वैध
By Admin | Updated: February 5, 2017 00:55 IST2017-02-05T00:55:38+5:302017-02-05T00:55:58+5:30
१० अर्ज अवैध : एकाच प्रभागात १७ अर्ज बाद

नाशिकरोडला २९१ उमेदवारांचे अर्ज वैध
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोडच्या सहाही प्रभागाच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत विविध कारणांमुळे १० अर्ज अवैध तर एकाच प्रभागात दोन गटात दाखल केलेल्यांपैकी १७ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे २९१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे मनसेच्या प्रभाग १८ ब मधील उमेदवार सुलोचना बोराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज रद्द करून क गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला आहे. नाशिकरोडच्या सहाही प्रभागात एकूण ३१८ इच्छुकांनी ५०३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनपा विभागीय कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता प्रभाग १७, १८, १९ मधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी डी.एच. हौसारे व प्रभाग २०, २१, २२ मधील छाननी निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्बळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रत्येक प्रभागातील एका गटाची उमेदवारी अर्ज छाननी स्वतंत्रपणे घेण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी भेट देऊन पाहणी केली.
२७ उमेदवारी अर्ज बाद
उमेदवारी अर्ज छाननीमध्ये प्रभाग १७ ड - अमोल अविनाश जगताप (दुसऱ्या प्रभागातील अनुमोदक, सुचक) प्रभाग १९ अ - प्रकाश बाबुराव चंदनसे (प्रतिज्ञापत्र व सही नाही), प्रभाग १९ ब - अनुराधा विनोद गारूडे (मतदार यादीत नाव नाही), प्रभाग २० अ - प्रशांत चंद्रकांत गांगुर्डे (अर्जावर सही नाही), संतोष देवराम शेळके (कागदपत्रे अपुर्ण), अरुण प्रेमनाथ आहेर (सही व अनामत रक्कम पावती नाही), प्रभाग २० क - मंगल सुनील आडके (तिसरा अपत्य कॉलम रिकामा सोडला), प्रभाग २१ ब - युसूफ रंगरेज (जात पडताळणी प्रमाणपत्र नाही), प्रभाग २२ अ- संजय सोमनाथ लासुरे (कागदपत्रे अपुर्ण), प्रभाग २२ ड - शेख फिदा मोहम्मद इसार (अनुमोदक दुसऱ्या प्रभागातील) म्हणून हे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर एकाच प्रभागातील दोन गटात उमेदवारी अर्ज दाखल केले असून संबंधित उमेदवाराने सांगितल्याप्रमाणे एक गटातील उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. पुढीलप्रमाणे - प्रभाग १७ ब - भारती रमेश पगार, ड - गणेश सुकदेव गांगुर्डे, प्रभाग १८ अ - विलासराज मोहन गायकवाड, रोहिणी संतोष पिल्ले, ब - केतकी सुरेश बोराडे, मनसेच्या उमेदवार - सुलोचना नंदकिशोर बोराडे, क- लता बाळासाहेब ढिकले, प्रभाग १९ अ - किरण शामराव बोराडे, ब - भारती अंबादास ताजनपुरे, प्रभाग २० क - मंगलाबाई संपत लवटे, ड - उदय फकिरा भालेराव, संजय बाबुराव अढांगळे, प्रभाग २१ ड- रमेश शंकर धोंगडे, प्रभाग २२ ब - गौरी शंकर साडे, सुनीता उत्तम कोठुळे, जयश्री संजय कोठुळे, प्रणाल विक्रम कोठुळे या १७ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. त्यामुळे २९१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग २० ड मधील भाजपाचे उमेदवार संभाजी मोरूस्कर यांच्या गटाची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मोरूस्कर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा म्हणून तीन लेखी हरकती घेण्यात आल्या आहेत. छाननी प्रक्रिया प्रसंगी उमेदवार, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.आर. ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.