शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

28,819 स्वयंसेवक; 352 टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:38 IST

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

नाशिक : राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शालिमार चौकात सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थिताना स्वच्छताविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, सभागृहनेता दिनकर पाटील, महंत भक्तिचरणदास, प्रजापिता ब्रह्मकुमारी वासंतीदिदी यांनी हाती झाडू घेत परिसरात साफसफाई केली. मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत साफसफाई केल्यानंतर पालकमंत्री उंटवाडी तसेच संभाजी स्टेडियम येथे झालेल्या मोहिमेतही सहभागी झाले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले, नागरिकांनी पंधरवडा स्वच्छता अभियानाबरोबरच नियमित स्वच्छतेबाबतही जागरूक राहणे आवश्यक आहे असे सांगितले. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, चित्रकार सावंत बंधू, क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे, छायाचित्रकार प्रसाद पवार यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेने ४५२ ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. मोहिमेत २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला.११७ घंटागाड्या तैनातमहास्वच्छता अभियानासाठी महापालिकेने ११७ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्वयंसेवकांसाठी २५ हजार झाडू, ४० हजार मास्क व ४० हजार ग्लोज उपलब्ध करून दिले होते. कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्यांव्यतिरिक्त ३३ जेसीबी, ४१ डंपर व ३० ट्रॅक्टर तैनात करण्यात आले होते.जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षस्वच्छता मोहिमेत विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनीही सहभाग नोंदवला. परंतु मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधले ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी. जिल्हाधिकाºयांनी काही नागरिकांच्या सोबतीने दोन-तीन ब्लॅक स्पॉट्स स्वच्छ केले.१४२ शाळांचा सहभाग४शहरातील सहाही विभागांतील १४२ शाळांमधील १९ हजार ७४१ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाय, १९४ स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग नोंदविला. महापालिकेचे ३१५५ कर्मचारी आणि ५९२३ नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सदर मोहीम राबविण्यात आली.