शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २८७ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:32 IST

उशिरा व अपुºया पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रुपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्या अंतर्गत भाऊबंदकीच्या वादामुळे पडून आहे.

ठळक मुद्देशासनाची मदत : ३४ कोटी रुपये अंतर्गत वादामुळे पडून

नाशिक : उशिरा व अपुºया पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रुपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्याअंतर्गत भाऊबंदकीच्या वादामुळे पडून आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन झाले, परिणामी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत करून जूनअखेर पीक पेरणी केलेल्या शेतकºयाला पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसावे लागले. जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले असले तरी, जिल्ह्यातील काही विशिष्ट भागाकडे पावसाने वक्रदृष्टी कायम ठेवली. आॅगस्ट महिन्याच्या दुसºया सप्ताहात हजेरी लावलेल्या पावसाने थेट सप्टेंबरमध्येच पुन्हा आगमन केले.शासनाने सरसकट संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व राष्टÑीय आपत्ती निवारण व्यवस्थापनांतर्गंत दुष्काळी मदत जाहीर केली. यात जिल्ह्णातील पाच लाख ४१ हजार २५७ शेतकºयांचे चार लाख, ८० हजार ६८५ हेक्टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झाले. शासनाने कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकºयाला साडेसहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायती जमीन असलेल्यांना तेरा हजार रुपये व फळबागांना अठरा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याला २८७ कोटी ७३ लाख, ४७ हजार रुपये अनुदान देण्यात आले असून, ते दुष्काळी तालुक्यांना बाधित शेतकºयांच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात आले असून, तालुका पातळीवरून शेतकºयांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.परंतु ३४ कोटी २६ लाख २६ हजार रुपये विनावाटप पडून आहेत. त्यात काही शेतकरी शासनाची मदत मिळण्यापूर्वीच मयत झाले तर काही शेतकरी कुटुंबात न्यायालयात वाद सुरू आहेत. काहींचे बॅँक खात्याची माहिती नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये दुष्काळ जाहीरखरिपाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, चांदवड, सिन्नर, नांदगाव, देवळा, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय पथकामार्फत दौरा करून माहिती जाणून घेतली. त्यात खरिपाचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये शासनाने गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी