जिल्ह्यात दिवसभरात २८४७ कोरोनाबाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:34 AM2021-03-30T01:34:21+5:302021-03-30T01:35:14+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन हजारांच्या आसपासचा आकडा कायम राखला असून साेमवारी (दि. २८) एकूण २८४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. सोमवारी पुन्हा २५ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २३५१ वर पोहोचली आहे. 

2847 corona affected in a day in the district! | जिल्ह्यात दिवसभरात २८४७ कोरोनाबाधित !

जिल्ह्यात दिवसभरात २८४७ कोरोनाबाधित !

Next
ठळक मुद्देसावधानता गरजेची : बळींचा आकडा २५ वर

नाशिक  : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन हजारांच्या आसपासचा आकडा कायम राखला असून साेमवारी (दि. २८) एकूण २८४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. सोमवारी पुन्हा २५ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २३५१ वर पोहोचली आहे. 
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १६८१ तर नाशिक ग्रामीणला ९८१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १७५ व जिल्हाबाह्य ३३ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ५, ग्रामीणला १७ तर मालेगावला ३ असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोर चिंता कायम आहे. 
गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारांवर राहिल्यानंतर प्रारंभी तीन हजार 
तर शुक्रवारी बाधित संख्येने 
चार हजारांपर्यंत मजल मारल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा 
बाधित संख्येत हजाराची भर 
पडल्याने बाधितांचा आकडा 
शनिवारी ५ हजारांनजीक पोहोचला असल्याने यंत्रणेसमोर आव्हान कायम आहे.
प्रलंबित अहवाल 
पाच हजारांनजीक 
जिल्ह्यात तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून सोमवारी ही संख्या ४ हजार ९१० वर पोहोचली.
कोरोनामुक्ततेचा दर ८५ टक्क्यांखाली
जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर गत महिन्यात ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र सोमवारपर्यंत कोरोनामुक्ततेच्या दरात एकूण १३ टक्क्यांहून अधिक घट आली असून ते प्रमाण ८४.२३ वर आले आहे. 

उपचारार्थी २५ हजारांवर 
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या २५ हजार १९० वर पोहोचली आहे. त्यात १५ हजार २३३ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ८१४८ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, मालेगाव मनपा क्षेत्रातील १५९५ तर जिल्हाबाह्य २१४ रुग्णांचा त्यात समावेश आहे.

Web Title: 2847 corona affected in a day in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.