शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:58 IST

म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली.

नाशिक : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात उज्ज्वला संतोष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलानगरच्या मधुबन बंगल्याच्या परिसरातील रहिवासी उज्ज्वला या रविवारी सायंकाळी त्यांच्या मैत्रीण राधा अग्रहरी यांच्यासमवेत म्हसरूळ येथील कलानगर ते रामेश्वरनगर दरम्यान फेरफटका मारत असताना वाघाडी पुलाजवळ अजिंक्यतारा सोसायटी रस्त्यासमोर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने कोळी यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सदर घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा परिसरात सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडल्याने म्हसरूळ पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच असून, पोलिसांना सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यात अपयश येत आहे. पाथर्डी फाटा येथील माउलीनगर येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातून सुमारे ४८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बळजबरीने ओढून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्चना कैलास धोंडगे (४२, रा. लक्ष्मीनारायण हाईट्स समर्थनगर) या त्यांची मैत्रीण निकिता पंत यांच्याबरोबर मंगळवारी (दि.१६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माउलीनगर येथून पायी घरी जात होत्या. यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव वेगात येऊन धोंडगे यांच्या गळ्यात असलेली १६ ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी धोंडगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.कार्यालय फोडून ७० हजारांचा ऐवज लंपाससरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. पाटील लेन-२मधील कॉलेजरोड परिसरात असलेल्या हेरंब महादेव गोविलकर यांच्या बंद कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप, रोकड असा एकूण ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. समर्थनगर कॉलेजरोड परिसरात गोविलकर यांचे कार्यालय आहे. बंद कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयामध्ये असलेले ५० हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉपसह वीस हजारांची रोकड असा एकूण ७० हजारांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस