जिल्ह्यात २७८ कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:48+5:302021-01-13T04:35:48+5:30

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ११) एकूण २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १९७ जणांची भर पडली ...

278 corona free in the district! | जिल्ह्यात २७८ कोरोनामुक्त!

जिल्ह्यात २७८ कोरोनामुक्त!

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ११) एकूण २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १९७ जणांची भर पडली आहे. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रात एक तर ग्रामीणला एकाचा, याप्रमाणे दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २,०१३ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ६७५ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ९ हजार ०७३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,५८९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.८० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.३४, नाशिक ग्रामीण ९६.१८, मालेगाव शहरात ९३.२१, तर जिल्हाबाह्य ९४.२६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५८ हजार ५०७ असून, त्यातील ३ लाख ४४ हजार ७७० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार ६७५ रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ०६२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 278 corona free in the district!