जिल्ह्यात २७८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:17+5:302020-12-05T04:24:17+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ४) नवीन ४२४ रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६, ...

जिल्ह्यात २७८ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ४) नवीन ४२४ रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ७ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १८२०वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २ हजार ५४८वर पोहोचली असून, त्यातील ९७ हजार ४८९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३२३९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.०७वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०६, नाशिक ग्रामीण ९३.१९, मालेगाव शहरात ९२.९२, तर जिल्हाबाह्य ९२.८६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३२३९ बाधित रुग्णांमध्ये १७४५ रुग्ण नाशिक शहरात, १३३७ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३८ रुग्ण मालेगावमध्ये, तर १९ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ८८ हजार १८२ असून, त्यातील दोन लाख ८४ हजार ६०२ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख दोन हजार ५४८ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,०३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.