२७० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना

By Admin | Updated: May 22, 2016 00:34 IST2016-05-22T00:22:04+5:302016-05-22T00:34:42+5:30

२७० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना

270 MT of mango leaves to the US | २७० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना

२७० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला रवाना

लासलगाव : येथील डॉ.भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषकमधून सुमारे २७० मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हापूस व अन्य जातींचा आंबा अमेरिकेला रवाना झाला. लवकरच आॅस्ट्रेलियालाही आंबा रवाना होणार असल्याचे समजते.
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला झाली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकावारी सुरू झाली असली तरी यंदा नवीन व्हरायटीने मजल मारली आहे.
फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातली होती. त्यानंतर अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील विकिरण प्रक्रि या २७० मेट्रिक टन आंब्यांवर करण्यात आली. सध्या लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रि या केली जात आहे.
लासलगाव येथे ३१ आॅक्टोंबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.
मात्र, येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाऱ्या आंब्यामध्ये
हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
(वार्ताहर)

Web Title: 270 MT of mango leaves to the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.