शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
4
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
5
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
6
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
7
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
8
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
9
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
10
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
11
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
12
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
13
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
14
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
15
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
16
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
17
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
18
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
19
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
20
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

२७ मि.मी : नाशिककरांना दीड तास परतीच्या पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 20:59 IST

पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाच्या भुयारी गटार विभागाच्या तयारीचे पितळ उघडेसंध्याकाळी घरी परतणा-या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.

नाशिक :नाशिककरांना परतीच्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी पाच वाजता परतीच्या पावसाचे ढग शहर व परिसरात दाटून आले अन टपोऱ्या थेंबाच्या जोरदार सरींच्या वर्षावात नाशिककर पुन्हा चिंब झाले. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळी मुसळधार पाऊसधारा बरसू लागल्याने घरी परतणा-या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.आठवडाभरापासून शहरात उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे कमाल तपमानाचा पारा थेट ३० अंशापर्यत सरकल्याने सप्टेंबरच्या पंधरवड्यातच नागरिकांना ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला होता. वातावरण उष्ण बनल्याने परतीच्या पावसाची नाशिककर प्रतीक्षा करत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी दीड तास जोरदार पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अचानक आलेल्या पावसाने संध्याकाळी घरी परतणा-या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. महापालिका प्रशासनाच्या भुयारी गटार विभागाच्या तयारीचे पितळ परतीच्या पावसाने उघडे पाडले. जुने नाशिक, भद्रकाली, अशोकस्तंभ, घनकर गल्ली, वकिलवाडी, वडाळा आदी भागात गटारींचे सांडपाणी रस्त्यावर वाहतानाचे चित्र दिसले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारविषयी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.जिल्ह्याला परतीच्या पावसाची ओढशेतक-यांना परतीच्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. खरीपाच्या पिकांवर संकट आले असून राज्यभरात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. नाशिक तालुक्यासह दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात मंगळवारचा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाकडे शेतक-यांचे डोळे लागले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक