नायलॉन मांजा विक्रेत्यांवर २६ रीळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST2021-01-09T04:11:40+5:302021-01-09T04:11:40+5:30

नाशिक : शहरात मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा ...

26 reels seized from nylon cat sellers | नायलॉन मांजा विक्रेत्यांवर २६ रीळ जप्त

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर २६ रीळ जप्त

नाशिक : शहरात मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे २६ रीळ जप्त केले. संशयित आरोपीला अंबड पोलिसांना हस्तगत केल्याची माहिती गुन्हेशाखेने दिली आहे.

गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकातील पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप चौक येथून हर्षद विजय खंदारे याला नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेऊन, त्याच्याकडून १६ हजार दोनशे रुपये किमतीचे २६ रीळ जमा केले. त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, वसंत खतेले, पोलीस उपनिरीक्षक मिथून म्हात्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, पोलीस हवालदार रमेश घडवजे, पोलीस शिपाई संतोष माळोदे, बाळा नांद्रे, गौरव गवळी, जयंत शिंदे, कोमल यादव यांचा कारवाई करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकात समावेश होता.

Web Title: 26 reels seized from nylon cat sellers