शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शहरात एकाच दिवसात २६ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:30 IST

आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देग्राफ वाढताच : एकूण संख्या १७८ वर, नाशिककरांच्या चिंतेत वाढ

नाशिक : आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.शहरातील वाढत्या रुग्ण संख्येने सध्या मालेगावनंतर आता नाशिक शहर हॉटस्पॉट ठरले आहे. गुरुवारी (दि.२८) शहरात १४ बाधित आढळले होते. शुक्र वारी (दि.२९) शहरात नऊ रुग्ण आढळले. यात सिडकोतील साईबाबानगर येथील ४५ वर्षीय २६ मे रोजी त्रास होत असल्याने सातपूर येथील ईएसआय रु ग्णालयात तपासणीसाठी गेली होती. या महिलेच्या घसास्त्रावाचे नमुने घेतल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर जुने नाशिक प्रमोदगल्ली येथील २१ वर्षीय युवकाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जुने नाशिकमधील कमोदगल्लीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व गणेशनगर येथील एक रहिवासी तसेच द्वारका परिसरातील ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मालेगाव येथे कार्यरत असलेल्या, परंतु नाशिकमध्ये वास्तव्य असलेल्या पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पंचवटीत क्र ांतिनगर येथील बाजार समितीत काम करणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता, आता त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचवटीतील गणेश वाडी येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल असून, त्याच्यावर सध्या खासगी रु ग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंचवटीतच रामवाडी येथील सीताराम कॉलनीतील ३१ वर्षीय रहिवासी मुंबईहून कंपनीच्या कामानिमित्त नाशिकला आलेला होता. तोही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. महालक्ष्मी थिएटर येथील लोकसहकारनगर येथील रु ग्णाच्या संपर्कातील व त्यांच्या कुटुंबातील १६ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सिन्नर फाटा येथील २६ वर्षीय रहिवासी हा नातेवाइकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्याच्यावर सिन्नरमध्ये उपचार सुरू आहेत.रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात शहरात १७ रुग्ण आढळले असून, यात पेठरोड येथील राहुलवाडी, जुने नाशिक (कथडा) तसेच सातपूर अंबड लिंकरोड येथे प्रत्येकी १, दीपालीनगर येथे ४, वडाळा शिवार आयटी पार्क सोसायटी परिसरात ७ तर नाईकवाडीपुरा येथे ३ रुग्ण आढळले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य