शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षी  सुरू केलेल्या उपक्रमाची  २५७५ विद्यार्थ्यांनी  केली संकल्पपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:05 IST

नाशिक येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कार : एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या एक कोटी सूर्यनमस्कार घालून मागील वर्षी याच दिवशी सुरू केलेल्या उपक्रमाची संकल्पपूर्ती बुधवारी (दि. २४) केली.

नांदगाव : नाशिक येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कार : एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या एक कोटी सूर्यनमस्कार घालून मागील वर्षी याच दिवशी सुरू केलेल्या उपक्रमाची संकल्पपूर्ती बुधवारी (दि. २४) केली.  यात नांदगाव संकुलातील व्ही.जे. हायस्कूल, मि. भि. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव माध्यमिक विद्यालय, सावरगाव, किसान माध्यमिक विद्यालय, वाखारी, सरस्वती विद्यामंदिर, मनमाड या शाळांमधील २५७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेजच्या मैदानावर सामूहिक सूर्यनमस्कार घालून एक जागतिक विक्रम स्थापित  केला.  या सोहळ्यास हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांनी स्वत: विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक केले. आपल्या मनोगतात त्यांनी आजच्या यांत्रिक युगात आजची पिढी व्यायामापासून दूर जात आहे. सरासरी आयुर्मान घटत चालले आहे. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगून त्यांनी अष्टांग योगाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षस्थानी नांदगाव संकुलाचे प्रमुख शशिकांत आंबेकर होते. प्रास्ताविक सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण यांनी केले.  संकल्पपूर्ती सोहळ्याचे शानदार उद्घाटन सर्व प्रमुख अतिथी व सर्व शाळांतील शालेय समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नियोजन विजय चव्हाण, राहुल चिखले, वाल्मीक जाधव, सुनीता देवरे यांनी केले. सूत्रसंचालन वृषाली गढरी यांनी केले, तर आभार जयंत निकम यांनी मानले.विद्यार्थ्यांमध्ये उत्साह सूर्यनमस्कारप्रसंगी अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल धर्मेश यादव (शौर्यचक्र विजेते), नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, पोलीस निरीक्षक बशीर शेख, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजीव धामणे, टी.एम. बोर्ड, अध्यक्ष भय्यासाहेब चव्हाण, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पटेल उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियाचे अधिकारी उमेश गायधनी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक व शाळा प्रमुखांना देण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी