२० जागांसाठी अडीचशे अर्ज दाखल
By Admin | Updated: February 7, 2016 00:01 IST2016-02-07T00:00:33+5:302016-02-07T00:01:42+5:30
संपतराव सकाळे बिनविरोध : ८ फेब्रुवारीला माघारी

२० जागांसाठी अडीचशे अर्ज दाखल
नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.६) उमेदवारी नामनिर्देशन अर्ज विक्रीच्या अखेरच्या दिवशी एकूण २५१ अर्ज दाखल केले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून विद्यमान संचालक संपतराव सकाळे यांची बिनविरोध निवड झाल्यासारखी आहे. त्र्यंबकेश्वर तालुका संचालकपदासाठी त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव रोहित सकाळे यांचा अर्ज आहे. रोहित सकाळे सोमवारी माघारीच्या दिवशी माघार घेणार आहे. शनिवारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये मावळते अध्यक्ष शिवाजी रौंदळ, संचालक दिलीप पाटील, आनंदा चौधरी, राजाराम खेमनार, शरद नाठे, संपतराव सकाळे, चंद्रलेखा मुरलीधर जाधव, शरद काळे, गोरख शिंदे, दिनकर उगले, प्रमोद मुळाणे, म्हसू कापसे, योजना अहेर, अरुण गायकर, राजेंद्र भोसले, योगेश हिरे, संजय चव्हाण या संचालकांसह जि. प. सदस्य सुरेश पवार, शशिकांत (पिंटू) आव्हाड, आप्पा दराडे, सुनील आडके, प्रकाश म्हस्के, सुभाष होळकर, सुनील पैठणकर, नारायण राजे, अनिता भामरे, लता पाटील, संपत काळे, तेज कवडे, प्रमोद भाबड, मिलिंद रसाळ, विलास आडके, नाना संभेराव, संभाजी पवार, राजेंद्र पाटील, निवृत्ती महाले, अर्जुन चुंबळे, मनोज घोडके, रावसाहेब कोशिरे, मनोज दळवी यांच्यासह एकूण २५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
सोमवारी (दि. ८) नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. ९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. ६ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान घेण्यात येईल. त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर मतमोजणीस प्रारंभ होईल. जिल्हा मजूर संघाच्या सभासद मतदारांची संख्या ११८९ असून, त्यापैकी ११२९ सभासदांचे ठराव करण्यात आल्याने हे ११२९ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)