घंटागाडी ठेक्यासाठी २५ निविदा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 23:33 IST2016-03-31T23:30:14+5:302016-03-31T23:33:40+5:30

घंटागाडी ठेक्यासाठी २५ निविदा दाखल

25 tender forms for the carriageway | घंटागाडी ठेक्यासाठी २५ निविदा दाखल

घंटागाडी ठेक्यासाठी २५ निविदा दाखल

 नाशिक : महापालिकेने पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्यासंबंधी विभागनिहाय राबविलेल्या निविदाप्रक्रियेत २५ निविदा दाखल झाल्या आहेत. सातपूर विभागात मात्र एकच निविदा दाखल झाल्याने याठिकाणी फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका महासभेने घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनाने सुरुवातीला निविदाप्रक्रिया राबविली असता शून्य प्रतिसाद मिळाला होता. निविदापूर्व बैठकीला २१ ठेकेदारांनी सहभाग नोंदवूनही निविदाप्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. घंटागाडी कामगारांना सुधारित दराने किमान वेतन देणे आणि घंटागाडी उशिरा गेल्यास दंडात्मक कारवाई यासंदर्भात ठेकेदारांनी आक्षेप घेतले होते. पहिल्या प्रक्रियेला शून्य प्रतिसाद मिळाल्यानंतर आयुक्तांनी काही अटी-शर्ती शिथिल करण्याची तयारी दाखविली आणि नव्याने पुन्हा प्रक्रिया राबविली. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत २९ मार्चपर्यंत होती. बुधवारी सदर निविदा उघडण्यात आल्या असता नाशिकरोड विभागात ६, पश्चिम विभागात ४, सिडको विभागात ४, नाशिक पूर्व विभागात ५, पंचवटी विभागात ५ निविदा दाखल झाल्या आहेत. तर सातपूर विभागासाठी केवळ एकच निविदा दाखल झालेली आहे. त्यामुळे सातपूर विभागापुरता पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यमान घंटागाडीच्या ठेकेदारांनी कामगारांना सुधारित दराने किमान वेतन अदा केले नाही म्हणून प्रशासनाने चारही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले होते शिवाय त्यांना नव्याने होणाऱ्या निविदाप्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई केली होती. परंतु, नव्याने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत विद्यमान ठेकेदारांनीही निविदा भरल्या असल्याचे समजते. त्यामुळे प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 25 tender forms for the carriageway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.