शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून २५ सर्पांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:08 IST

कडवा कालव्यामधील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांसह घटनास्थळ गाठले.

नाशिक : कडवा कालव्यामधील पाण्यात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांसह घटनास्थळ गाठले.  याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पळसे साखर कारखान्याकडे जाणाºया रस्त्यालगत कडवा कालवा वाहतो. या कालव्यात काही प्रमाणात पाणी होते. त्यामुळे पाण्यात आढळून येणारे बिनविषारी ‘दिवट’ जातीचे २५ सर्प मासेमारीसाठी टाकण्यात आलेल्या नॉयलॉनच्या जाळ्यात अडकून मृत झाले. काही सर्प पाण्यावर तरंगत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका जागरूक नागरिकाने तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तत्काळ वनरक्षक विजय पाटील, गोविंद पंढरे इको-एको फाउण्डेशनचे सर्पमित्र वैभव भोगले यांना घटनास्थळी रवाना केले. कडवा कालव्याजवळ पोहचल्यानंतर तत्काळ वनरक्षकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यावर तरंगत असलेल्या सर्पांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर युवकांच्या मदतीने वनरक्षकांनी जाळे ओढून बाहेर काढले असता सगळ्यांनाच धक्का बसला कारण त्या जाळ्यात मोठ्या संख्येने सर्प अडकल्याचे आढळून आले. तत्काळ कर्मचाºयांनी जाळे मोकळे करत तब्बल पाच सर्पांना जीवदान दिले; मात्र दुर्दैवाने तोपर्यंत २५ सर्प मृत्युमुखी पडलेले होते. पाण्यामधील जैवविविधतेमध्ये आढळणाºया सर्पांपैकी ‘दिवट’ जातीच्या तब्बल २५ सर्पांचा अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने निसर्गप्रेमी व वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वनकर्मचाºयांनी मृत सापांचा पंचनामा करत पाच सर्पांना सुरक्षित ठिकाणी सोडले. ‘दिवट’ हा सर्प मुख्यत: पाणथळ जागेमध्ये आढळून येतो. हा सर्प शक्यतो समूहाने वावरत असतो व त्याचे प्रमुख खाद्य मासे, बेडूक असे असते.प्रथमदर्शनी विषप्रयोगाचा संशयघटनास्थळी पोहचलेल्या कर्मचाºयांना प्रथमदर्शनी पाण्यामध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय आला; मात्र बारकाईने कालव्याच्या पाण्याचे निरीक्षण केल्यानंतर पाण्यामध्ये अन्य मासे, बेडूक असे जलचर सुरक्षितरीत्या हालचाल करताना आढळून आले. त्यामुळे विषप्रयोगाचा घेतला जाणारा संशय संपुष्टात आला. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून जाळ्यात अडकून श्वास गुदमरल्याने सर्प मृत्युमुखी पडल्याचे वनविभागाला सांगितले.

टॅग्स :snakeसापNashikनाशिकWaterपाणी