कोट्यातील २५ टक्के प्रवेश आॅनलाइन

By Admin | Updated: February 16, 2016 00:33 IST2016-02-16T00:04:51+5:302016-02-16T00:33:13+5:30

मनमाड : नांदगाव तालुक्यातील १४ शाळांचा समावेश

25 percent of quota admission online | कोट्यातील २५ टक्के प्रवेश आॅनलाइन

कोट्यातील २५ टक्के प्रवेश आॅनलाइन

मनमाड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आधार कायद्यान्वये राज्य शासनाने शासनमान्य विविध प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी ठेवल्या आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मनमाड शहरातील सात शाळांसह नांदगाव तालुक्यातील १४ शाळांना हे प्रवेश बंधनकारक आहे. सदरची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी मंदोदरी पाटील यांनी दिली.
तळागाळातील अनेक विद्यार्थ्यांना हालाखीच्या परिस्थितीमुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेता येत नाही. चांगल्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असतानाही या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अडचणीचे ठरते. यावर मात करण्यासाठी शासनाने शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेबसाइटवरून हे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. संच मान्यतेसाठी शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले यूजरनेम आणि पासवर्ड वापरून हे प्रवेश करता येतील. या बाबत तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन
करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण यांनी सांगितले.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा रहिवासी पुरावा, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला, विद्यार्थ्यांचे रंगीत छायाचित्र
अशी कागदपत्रे प्रवेशाच्या वेळी पालकांना शिक्षण विभागाकडे स्कॅन करून पाठवावी लागणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: 25 percent of quota admission online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.