शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

२५ टक्के सफाई कामगार गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:09 IST

१५५० सफाई कामगारांपैकी ३६७ गैरहजर त्यातील १६० जणांची विनापरवानाच दांडी, एका कामगाराच्या ऐवजी भलताच कामावर असे अनेक धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१३) महापालिका प्रशासनाच्या आॅपरेशन क्लीनअपमध्ये आढळले.

ठळक मुद्देआॅपरेशन क्लीनअप : विभागीय अधिकारी, निरीक्षकांना नोटिसासतत गैरहजर राहणारे होणार निलंबित

नाशिक : १५५० सफाई कामगारांपैकी ३६७ गैरहजर त्यातील १६० जणांची विनापरवानाच दांडी, एका कामगाराच्या ऐवजी भलताच कामावर असे अनेक धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१३) महापालिका प्रशासनाच्या आॅपरेशन क्लीनअपमध्ये आढळले. आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे आढळले आहे. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कामगारांचे थेट निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तर एकूणच अव्यवस्थेविषयी विभागीय अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.शहराच्या विविध भागात अस्वच्छता त्या अनुषंगाने गेलेल्या महिन्याच्या अखेरीपर्यंत असलेली रोगराई या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाची घेतलेली झाडाझडती यामुळे प्रशासनाने मंगळवारी (दि.१३) भल्या सकाळी म्हणजे सहा ते सात वाजेच्या दरम्यान प्रत्येक प्रभागात (वॉर्डात) खाते प्रमुखांनी अचानक भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. खास गोपनीय बाब म्हणून सोमवारी (दि.११) रात्री उशिरा नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व खाते प्रमुख भल्या सकाळीच सर्व विभागात पोहोचले तसेच सफाई कामगारांच्या हजेरी शेडला भेटी दिल्या. त्यावेळी अनेक चमत्कारीक प्रकार आढळले.बहुतांशी ठिकाणी वेळेवर कामगारांची हजेरी नव्हती. तसेच अनेक ठिकाणी कामगार गैरहजर असल्याचे हजेरी मस्टरवर नोंदविले होते मात्र अनेक ठिकाणी वेळ उलटून गेल्यानंतरही पूर्वसूचना न देताच कामगार गैरहजर असल्याचे आढळले. महापालिकेकडे एकूण १५५० सफाई कामगार आहेत. त्यापैकी १६० कामगार गैरहजर होते. तर २०७ कामगार हे पूर्वसूचनेवरून गैरहजर होते, परंतु दीड हजारपैकी तीनशे कामगार एकाच दिवशी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.इतक्या कमी कर्मचाºयांमध्ये सफाईचे काम कसे शक्य होतील असाही प्रश्न निर्माण झाला. मिळालेली माहिती संकलित करून सर्व माहिती प्रशासनाला सादर करण्यात आली. त्यानंतर दुपारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली. यावेळी हजेरी शेडला भेट देणे हे विभागीय अधिकाºयांचे नियमित काम असताना अनेक दिवसांत किंवा महिन्यात अधिकाºयांनी भेटी दिल्या नसल्याचे आढळले. तसेच बोगस कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांचे दुर्लक्ष या सर्व पार्श्वभूमीवर संबंधिताना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे कामगार वारंवार गैरहजर राहात आहेत आणि महापालिकेला प्रतिसादही देत नाही अशा सर्वांनाच निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.घंटागाड्या वाचल्यामहापालिकेच्या या मोहिमेत घंटागाड्यांची पोलखोल करण्याचेदेखील नियोजन होते. मात्र, आॅपरेशन क्लीनअप अवघ्या तासाभरासाठी होते तोपर्यंत अनेक प्रभागात घंटागाड्या सुरूदेखील झाल्या नव्हत्या. त्यामुळे लवकरच आॅपरेशन घंटागाडीदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.एकाच्या नावावर दुसराच करतो काममहापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये एका सफाई कामगाराच्या जागी कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याचे एका खाते प्रमुखाच्या पाहणीत आढळले. त्यावरदेखील कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेत कायम कर्मचाºयांकडून परस्पर खासगी व्यक्ती नेमून काम करण्याचे प्रकार यापूर्वीही चर्चेत होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य