आडगावला दोन गटांत दंगल २५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST2021-07-03T04:10:52+5:302021-07-03T04:10:52+5:30

न्यायालयीन खटला मागे घेण्याच्या कारणांवरून झालेल्या हाणामारीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रभाकर माधवराव बर्वे यांनी दिलेल्या ...

25 people rioted in two groups in Adgaon | आडगावला दोन गटांत दंगल २५ जणांवर गुन्हा

आडगावला दोन गटांत दंगल २५ जणांवर गुन्हा

न्यायालयीन खटला मागे घेण्याच्या कारणांवरून झालेल्या हाणामारीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रभाकर माधवराव बर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अहिलाजी पेखळे, श्याम बर्वे, शरद पेखळे, बाळासाहेब बर्वे, यशवंत बर्वे, संदीप बर्वे, दत्तू बर्वे, आहेर मामा, तीन महिला व अन्य चार जणांनी मारहाण केल्याचे तसेच चारचाकीचे (क्रमांक एमएच १५ डीडी १४३१) नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तर श्याम पोपट बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रभाकर माधवराव बर्वे, मंगेश प्रभाकर बर्वे, तुषार प्रभाकर बर्वे, मंदाकिनी प्रभाकर बर्वे, योगेश पानगव्हाणे, वसंत पानगव्हाणे व अन्य दोघे जण सर्व रा. उगाव निफाड आदींनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कपले तपास करीत आहेत.

Web Title: 25 people rioted in two groups in Adgaon