ठेंगोडा ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी

By Admin | Updated: July 29, 2016 00:20 IST2016-07-28T23:55:04+5:302016-07-29T00:20:49+5:30

ठेंगोडा ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी

25 lakhs funds to the Chengoda Gram Panchayat | ठेंगोडा ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी

ठेंगोडा ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी

ठेंगोडा : येथील ग्रामपंचायतीस जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नागरी सुविधांसह पंचवीस लाख रुपये विशेष अनुदान मंजूर झाले आहे.
सन २०१५-१६ यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) योजनेंतर्गत जिल्ह्यातील पर्यावरण विकास आराखड्यास पात्र असलेल्या ३० पैकी १२ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. यामध्ये ठेंगोडा ग्रामपंचायतीचा समावेश असून, सदर योजनेंतर्गत ठेंगोड्यास पंचवीस लाख रु पये निधी मिळणार असून, प्रत्यक्ष कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. सदर योजेनेतून गणेशनगर, इंदिरानगर व माळीवाडा येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रि टीकरण करणे यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम पंधरा लाख असून, यापैकी शासनाने तेरा लाख पन्नास हजार रु पये अनुदान मंजूर केले आहे.
गावातील भूमिगत गटार बांधण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम नऊ लाख रु पये अनुदान मंजूर केले आहे. सदर मंजूर कामासाठी ९० टक्के रक्कम निधी शासनाने मंजूर केला असून, दहा टक्के निधी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून करावयाचा आहे. पुढील टप्प्यात आराई ग्रामपंचायतीचा या योजनेत समावेश करून निधी मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: 25 lakhs funds to the Chengoda Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.