भावडे-वडाळा रस्त्यावर अपघात २५ जखमी
By Admin | Updated: May 15, 2015 23:56 IST2015-05-15T23:55:52+5:302015-05-15T23:56:12+5:30
भावडे-वडाळा रस्त्यावर अपघात २५ जखमी

भावडे-वडाळा रस्त्यावर अपघात २५ जखमी
देवळा : तालुक्यातील भावडे-वडाळा मार्गावरील वडाळा गावानजीक वळण रस्त्यावर वऱ्हाडाची पिकअप पलटी झाल्याने २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. शेरी (ता. देवळा) येथील लग्नाचे वऱ्हाड लासलगावजवळील वाळकेवाडी येथे गेले होते. लग्न आटोपून सदर वऱ्हाड पिकअपने वडाळीभोई-कांचनबारी मार्गे घराकडे परतत असताना सायंकाळी साडेपाच वाजता भावडे-वडाळा मार्गावरील वळण रस्त्याचा व उताराचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
यामुळे पिकअप (एमएच १५बीजे ५४०८) पलटी होऊन त्यातील २५ जण जखमी झाले आहेत. यात हाडांचे फ्रॅक्चर होऊन जखमी झालेल्यात महिलांची संख्या अधिक आहे. जखमींना तातडीने देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात
आले. जखमींवर डॉ. समीर काळे व डॉ. गणेश कांबळे यांनी प्राथमिक
उपचार करून त्यातील १५ जणांना मालेगाव, दोघांना नाशिक तर इतर दोघांना कळवण येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.