मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:14 PM2019-02-11T23:14:49+5:302019-02-11T23:15:22+5:30

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत, तर नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

25 employees of Malegaon M.P. | मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी?

मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी?

Next

मालेगाव : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत, तर नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ४४ फवारणी यंत्रचालक व ३५ बीट मुकादम स्वच्छता विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शहर स्वच्छतेच्या कामात गती येणार आहे.
संबंधित कर्मचारी आठ दिवसात हजर झाला नाही तर त्यांना नोटीस देऊन बडतर्फ केले जाणार आहे. दैनंदिन हजेरी अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. महापालिकेच्या कचरा डेपोवरील १६ कर्मचाºयांपैकी काही कर्मचारी स्वच्छता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागात ७ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून असे २१ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता विभागात कार्यरत राहणार आहे.
३५ बीट मुकादम व ४४ फवारणी यंत्रचालक स्वच्छता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. फवारणीचा खाजगी ठेका दिला जाणार आहे. या बदलामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागात सुमारे ११० कर्मचाºयांची भर पडणार आहे. तर वारस हक्काचे शंभर कर्मचारी घेतले जाणार आहे. कर्मचाºयांच्या वाढत्या संख्येमुळे शहर स्वच्छतेच्या कामामुळे गतीमानता येणार आहे. सुलभ व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरूस्तींचे टेंडर काढण्यात येणार आहे.
शहरात डुकरांच्या वाढलेला सुळसुळाटामुळे नागरिकांना त्रास होत होता. सध्या महापालिकेकडून डुक्कर पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
गेल्या काही दिवसांपासून शहर स्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या होत्या. महापालिका आयुक्त बोर्डे यांनी स्वच्छतेप्रश्नी गंभीर दखल घेतली आहे. गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सतत गैरहजर असणाºया २५ ते ३० कर्मचाºयांवर कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: 25 employees of Malegaon M.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.