मारहाणप्रकरणी २५ अटकेत
By Admin | Updated: October 13, 2016 00:47 IST2016-10-13T00:36:24+5:302016-10-13T00:47:20+5:30
अंजनेरी : तुपादेवी फाट्यावर युवकांना मारहाण, वाहनांचे नुकसान

मारहाणप्रकरणी २५ अटकेत
त्र्यंबकेश्वर : मंगळवारी परिसरात झालेल्या दंगलीत सहभाग नोंदविलेल्या २५ जणांना त्र्यंबक पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले. अंजनेरी व तळेगाव फाट्यावर घोषणाबाजी करणाऱ्या युवकांनी मोटारसायकलस्वार युवकांना मारहाण केली व मोटारसायकलींचे नुकसान करून जाळपोळ केली.
यावेळी नाशिक येथील एका नेत्याच्या नेतृत्वाखालील युवकांनी डिजिटल फलक फाडून घोषणाबाजी केली या कारणावरून तुपादेवी फाटा येथील आधारतीर्थ आश्रमाजवळ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर जमाव जमवून एका कारच्या काचा फोडल्या, १० ते १२ किंवा त्यापेक्षाही जास्त मोटारसायकली जाळून त्यांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या दगडफेकीत आठ इसम व चार पोलीस अधिकारी जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) अंकुश शिंदे, प्रशांत मोहिते, अपर पोलीस अधीक्षक, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी आदिंनी भेट दिली. सरकारी पक्षातर्फे त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख
यांनी फिर्याद दिली असून, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. (वार्ताहर)