दुसऱ्या दिवशीही संततधार २४ तासांत २४२ मि.मी.पावसाची नोंद
By Admin | Updated: June 24, 2015 01:13 IST2015-06-24T01:12:59+5:302015-06-24T01:13:45+5:30
दुसऱ्या दिवशीही संततधार २४ तासांत २४२ मि.मी.पावसाची नोंद

दुसऱ्या दिवशीही संततधार २४ तासांत २४२ मि.मी.पावसाची नोंद
नाशिक : शहर व जिल्'ात पावसाची सलग दुसऱ्या दिवशी संततधार कायम होती. दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दिवसभर अधूनमधून हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत दिवसभरात २४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी नाशिक जिल्'ात सर्वदूर पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारीही सकाळपासूनच पावसाची रिपरिप कायम होती. दुपारनंतर काही वेळ पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र होते. मात्र, दिसवभरात अधूनमधून पावसाची हजेरी कायम होती. गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय नोंदविण्यात आलेली पावसाची मिलिमीटरमध्ये आकडेवारी अशी- नाशिक-२३.१, इगतपुरी-६२, दिंडोरी-१८, पेठ- १५, त्र्यंबकेश्वर-२९, मालेगाव-११, नांदगाव-००, चांदवड-१०.८, कळवण-१९, बागलाण-८.०, सुरगाणा-२०, देवळा-१०.२, निफाड-४.८, सिन्नर-११.६, येवला- ०० असा एकूण- २४२.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्'ात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने बळीराजाची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. जूनच्या अखेरीस खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)