२४० कोटींची देयके सादर

By Admin | Updated: April 2, 2017 01:11 IST2017-04-02T01:11:04+5:302017-04-02T01:11:20+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेची सर्व विभागांची मिळून २३९ कोटी ९९ लाखांची देयके ३१ मार्चअखेर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

240 crores pay bills | २४० कोटींची देयके सादर

२४० कोटींची देयके सादर

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेची सर्व विभागांची एकत्रितमिळून २३९ कोटी ९९ लाखांची देयके ३१ मार्चअखेर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेने शनिवारपर्यंत १६९ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची मार्च एण्डची घाई सुरू होती. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला मार्च एण्डच्या लगीनगाईत शुक्रवारी (दि.३१) ३५ कोटींचा निधी सायंकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर शुक्रवारी दिवसभरात ७२ कोटी ५८ लाखांची सुमारे १२५ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाला रस्ते व पुलांच्या कामांसाठी २० कोटी, तर लघुपाटबंधारे विभागाला बंधाऱ्यांच्या कामासाठी १५ कोटींचा निधीही अखेरच्या दिवशी प्राप्त झाल्याचे कळते. २९ व ३० मार्च या दोन दिवसांत सुमारे १६ कोटींची २२० देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे होते. २९ मार्च रोजी जिल्हा परिषदेला १८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. गुरुवारी (दि.३०) जिल्हा परिषदेला शासनाकडून ४१ कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यात ग्रामपंचायत विभागाला २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पहिल्या दिवशी सुमारे १२ कोटींची १५० देयके जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करण्यात आली होती. गुरुवारी सुमारे ४ कोटींची ७० देयके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ३१ मार्च उलटल्यानंतर २३९ कोटी ९९ लाखांची देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 240 crores pay bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.