२४ तास सेवा केवळ फलकावर

By Admin | Updated: December 3, 2015 23:33 IST2015-12-03T23:32:55+5:302015-12-03T23:33:21+5:30

निवेदन : मेडिकल रात्री होतात बंद

24 hour service only on the panel | २४ तास सेवा केवळ फलकावर

२४ तास सेवा केवळ फलकावर

नाशिक : शहरातील काही ठराविक भाग व त्या परिसरातील काही मेडिकल दुकानांचा अपवाद वगळता बहुसंख्य मेडिकल रात्री अकरा वाजेनंतर बंद होतात. ज्या मेडिकलवर २४ तास सेवा असे फलक आहे त्या मेडिकलचालकांकडूनदेखील केलेल्या दाव्यानुसार रात्री वैद्यकीय सेवा पुरविली जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एक मेडिकल एक विभाग २४ तास सेवा यानुसार सुरू करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाच्या उपआयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तत्काळ औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी किमान एका परिसरात एक तरी मेडिकल २४ तास सुरू असणे गरजेचे आहे. शहरातील बहुतांश मेडिकलबाहेर ‘२४ तास सेवा’ असे फळक झळकविण्यात आले आहेत; मात्र प्रत्यक्षात मेडिकल रात्री अकरा वाजेनंतर बंद होत असल्याने ‘सेवा’ फक्त फलकावरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे क रण्यात आली आहे. निवेदनावर सरचिटणीस रोहन देशपांडे, मनोज घोडके, संदीप भवर, ललित ओहोळ, बाजीराव मते, गणेश मोरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: 24 hour service only on the panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.